डेली एम के न्यूज नेटवर्क
दक्षिण काशी पंढरी नगरी मध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा अवतरली असल्याचे पहावयास मिळत आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे पंढरपूर शहरात झाली.आता देवभूमी पंढरी नगरी ला जोडल्या जाणाऱ्या 7
र्गांचे काम अंतिम टप्प्यात आले असून सर्वात मोठ्या 2 पालखी मार्गांचा भूमिपूजन सोहळा सोमवार दि. 8 नोव्हेंबर रोजी येथील रेल्वे ग्राउंड मैदानावर पार पडणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जनतेशी संवाद साधणार असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असून यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,खा.रणजितसिंह निंबाळकर,खा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार व भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग हा हडपसर,जेजुरी दिवेघाट ते मोहोळ पर्यंत असून एकूण 221 किमी तर 130 किमीचा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस,बारामती ते तोंडले- बोंडले असा असणार आहे.
आषाढी वारीसाठी आळंदी व देहूमधून लाखो भाविक पंढरीत येत असतात . हा भक्तीचा सोहळा महाराष्ट्राचे वैभव असून श्रद्धेचा विषय आहे . लाखो भाविक ज्या मार्गावरून चालत येतात , तो रस्ता भव्य व सुंदर असावा या हेतूने मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाचे काम करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दोन्ही रस्त्यांचे काम सुरू झाले आहे . सोमवारी या कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 965 हा 4 पदरी रस्ता होणार असून 965G हा तीन पदरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्ग होत आहे. याच कार्यक्रमात पंढरपूरला जोडणाऱ्या इतरही महामार्गांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.राज्यातील हे महामार्ग एकूण 223 किमीचे असून यासाठी अंदाजे रक्कम 1180 कोटी रुपये खर्च होत आहे.
या 2 पालखी मार्गांमुळे मुळे वारकरी,संत मंडळींचा पंढरपूर कडे येणारा प्रवास हा सुखकर होणार असून खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या माध्यमातून वारकरी भाविक भक्तांसाठी पांडुरंग धावून आला असल्याचे पहावयास मिळत आहे.
*केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या स्वप्नातील रस्ते*
केंद्रीय मंत्री गडकरी यांची पंढरपूर बद्दल मोठी भावनिक आस्था असून ते पांडुरंगाचे ते निस्सीम भक्त आहेत.त्यामुळे पंढरपूरला येणारे सर्व रस्ते व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे असावे हे त्यांचे स्वप्न असून ते स्वप्न आता प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साकारत असल्याचे बोलले जात आहे.
वारकरी भक्तांसाठी केंद्र सरकार धावून आले
गोरगरीब वारकर्यांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे. मात्र आता हा गोरगरीब वारकरी खऱ्या अर्थाने श्रीमंत होत असल्याचे पहावयास मिळत आहे. कारण या वारकऱ्यांच्या विविध सोयी सुविधांसाठी प्रत्यक्षात केेंद्रसरकारच धावून आले असून कोट्यवधी रुपये खर्च करून संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे काम होणार आहेत. एवढेच नव्हे तर 7 महामार्ग जोडले जाणारे पंढरपूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शहर असून केदारनाथ-बद्रिनाथ प्रमाणेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पंढरपूरच्या या दोन रस्त्याचे लोकार्पण करणार असल्यामुळे पंढरपूरचे देशातच नव्हे तर जगात नाव पोहोचणार आहे आहे.
आ. प्रशांत परिचारक
पंढरपूरच्या नावलौकिक भर
आमच्या दृष्टिकोनातून हे सर्वात मोठे काम होत आहे.वारकरी भाविक भक्त व सर्वसामान्य नागरिकांसाठी भाजप सरकारच्या वतीने नेहमीच विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच प्रत्यय आता येत असून विकासाचे व्हिजन घेऊन केंद्रातील मोदी सरकार काम करत आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पंढरपूरला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्यामुळे या कामामुळे आता पंढरपूरच्या नावलौकीकत मोठी भर पडली आहे.
आ. समाधान आवताडे