-
पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर येथे बैठक घेण्यात आले बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार होते , या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा , ज्येष्ठ पत्रकार पेन्शन योजना , घरकुल योजना , विमा योजना , पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण , राज्यातील यूट्यूब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता , पत्रकारांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी , यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती, त्याच बरोबर , कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास शासकीय मदत व शासकीय सेवेत समाविष्ट करणे , यासह पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा होऊन पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची निवड करण्यात आली , पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष आप्पाशा म्हेत्रे यांच्या हस्ते फेटा शाल नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी राम हुंडारे , अन्सार तांबोळी (BS) , अक्षय बबलाद , दत्ता पवार. नागनाथ गणपा , वैजिनाथ बिराजदार , सादिक शेख , इस्माईल शेख , प्रसाद ठक्का , सिध्दार्थ भडकुंबे , श्रीनिवास पेडी ,रोहित घोडके , रवी मन्हळ्ळी , विवेकानंद खेत्रि , लक्ष्मण गणपा ,अरुण सिडगिद्दी , अशोक कांगुडे , राजू येरगुंटला , श्रीनिवास वंगा , श्रीकांत बल्ला , श्रीकांत कोळी , नागमणी वग्गु , सूर्यकांत व्हनकडे , मुक्तम गौडा पाटील तसेच पंढरपूर शहर पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील , उपाध्यक्ष विजय कांबळे , सचिव विश्वास पाटील , रवींद्र शेवडे , सहसचिव रफिक अत्तार , चैतन्य उत्पात , बाहुबली जैन आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते