*६५ एकर परिसरातील महाआरोग्य शिबिराचे महाराज मंडळींच्या हस्ते उद्घाटन*

पंढरपूर:-

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

जाहिरात


या भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ६५ एकर परिसर येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 22,23 व 24 या कालावधीत करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महाराज मंडळींच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरून चालत भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांमध्येच परमेश्वर असून थकून भागून आलेल्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यातच परमानंद असल्याचे उदगार काढले.
यावेळी बोलताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.
भाविकांना योग्य प्रकारची सेवा मिळण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज आहे . भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यानंतर महाराज मंडळींनी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा सत्कार करून आभार मानले.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भैरवनाथ शुगर चे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले याच्यांसह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर, उपस्थित होते.

या शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, मोफत रक्त चाचण्या, डोळ्याची तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, औषध वितरण, कान-नाक-घसा तपासणी, आयुष्यमान कार्ड वितरण, ह्दयरोग तपासणी, चष्यांचे वाटप, इसीजी तपासणी मोफत केली जात आहे.
महा आरोग्य शिबीरासाठी उच्च तज्ञ डॉक्टर्स उपस्थित असून यात विविध विभागातील मोठमोठ्या रूग्णालयातील हे सर्व तज्ञ डॉक्टर्स आहेत. यांच्याकडून तपासणी, औषधोपचार आणि गरज वाटल्यास मोफत शस्त्रक्रिया देखील केली जात आहे.
महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून एकाच छताखाली प्रतिबंधात्मक उपचार आणि निदानात्मक उपचार या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर या शिबिरामध्ये आवश्यक शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, पार्कींग, स्वच्छता गृह, सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा आदी सुविधा पुरविण्यात आला आहे.
आरोग्य शिबीरात अतिदक्षता विभाग (ICU) सेंटर 6, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 3, प्राथमिक उपचार केंद्रे – 11, आरोग्य दूत 20, रुग्णवाहिका 07, 24 तास वॉर रूम कार्यरत राहणार असून, शिबीरासाठी 2 हजार 500 आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here