प्रतिनिधी:-
शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. तर मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या दहा वर्षात सोलापूर ओस पडले, असल्याची टीका यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी फुलचिंचोली, मगरवाडी, तारापूर, खरसोळी, पोहरगाव, विटे, आंबेचिंचोली, शंकरगाव या गावांचा दौरा केला. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी दहा वर्षात भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका केली. महागाई ने जनता त्रस्त झाली आहे ४०० रुपयेचा गॅस १२०० रुपये ला झाला.शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, त्यामुळे माझा उद्देश मत मागणे हा नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी हा गाव भेट दौरा असून याला नागरिकांतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मत महायुतीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी मांडले.
भाजपा अडचणीत असताना कधीही धावून आला नाही परंतु आता मते मागण्यासाठी फिरत आहेत परंतु जनता भाजपवर चांगलीच वैतागली आहे.दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून त्यांचे उमेदवार निवडून दिले परंतु आता त्यांचीच क्रेझ संपली आहे. त्यामुळे भाजपचा पराभव हा निश्चित असल्याचे सांगत मागील दहा वर्षात भाजपने सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन्हीही निष्क्रिय खासदार दिले. आताची लोकसभा निवडणूक ही पुढार्यांची नसून पुढारी विरुद्ध जनता अशीच आहे. हे भाषणात मोठे बोलतात हायवे केले,मोठे मोठे रस्ते केले परंतु तुम्ही ग्रामीण भागात आल्यानंतर तुम्हाला आता तरी रस्ते चांगले आहेत का असा संतप्त सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी केला.
यावेळी त्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी केली. व ही निवडणूक माझी नसून जनतेची निवडणूक असल्याचे सांगत खूप फुलचिंचोली हे क्रांतिकारी गाव आहे या गावातून व पंढरपूर तालुक्यातील सर्वच गावातून शिंदे साहेबांना चांगले मताधिक्य मिळाले होते यावर्षीही चांगले मताधिक्य द्या असे आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केले.
मतभेद विसरून मताधिक्य द्या- भगीरथ भालके
आताचे सरकार प्रश्नाचे जाण नसणार सरकार आहे. आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीमध्ये, घरा घरामध्ये भांडणे लावण्याचे काम हे सरकार करत आहे. मागील दहा वर्षापासून या सरकारने शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेला फसवण्याचे काम केले आहे. गेल्या दहा वर्षात निवडून आलेले भाजप खासदार शेतकऱ्यांच्या अडचणीवर बोलायला तयार नाहीत. सध्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे. मात्र, वीज नाही. फक्त कागदावरती 6 तास, 8 तास वीज आहे. प्रत्यक्षात मात्र वीज नाही.त्यामुळे आता लोकसभेला आपल्याला प्रणिती शिंदे यांना निवडून द्यायचे आहे तरी आपापसातील वाद मिटवून त्यांना कसे मताधिक्य देता येईल याकडे लक्ष द्या सर्व गट तट विसरून काम करा, असे आव्हान यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नेते भगीरथ भालके यांनी केले.
यावेळी भगीरथ भालके, प्रणिता भालके, प्रकाश पाटील, अमर सूर्यवंशी, सूनांजय पवार, संदीप पाटील, संदीप शिंदे, गणेश माने, महेश अधटराव, सतिष शिंदे, राहुल पाटील, मिलिंद मोलाने, नितीन शिंदे, अनिल माने, कल्याणराव बप्पा पाटील, राहुल पाटील, किशोर जाधव, संग्राम जाधव, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.