मनसे नेते दिलीप बापू धोत्रे आणि आद्य वीरशैव महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळीची खरेदी एकाच छताखाली
पंढरपूर प्रतिनिधी:-
येणाऱ्या दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदान येथे दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एक्सपो 2024 चा निरोप समारंभ मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते एक्सपो मध्ये सहभागी झालेल्या स्टॉलधाराकांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला .
यावेळी सर्वच स्टॉलधारक अतिशय आनंदात होते. सर्वांनी दिलीप बापू धोत्रे यांचे आभार म्हणाले.
यावेळी आद्य वीरशैव महिला मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शोभा कराळे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे,ऍड याशिन शेख,नगरसेवक मोहम्मद उस्ताद, शशिकांत पाटील, अनिल बागल, अप्पा करचे, बाबा चव्हाण, गणेश पिंपळनेरकर, सागर कांबळे इत्यादी उपस्थित होते.