*आमदार समाधाना अवताडे यांची कचरेवाडी, पाटखळ ,लोणार ,ममदाबाद, पडळकरवाडी, मानेवाडी, हुन्नूर या गावात प्रचारफेरीस जबरदस्त प्रतिसाद*

पंढरपूर:-
गावातील केलेल्या व सुरु असलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचं मतरुपी पाठबळ मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे” यांनी हुन्नूर येथे भेट दिली. यावेळी दादांनी राबवलेल्या विविध विकासाच्या धोरणांच्या माध्यमातून झालेल्या गावातील कल्याणकारी विकास कामे जनतेसमोर मांडत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी भाजपा व महायुती तसेच मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा यांनी आपल्या अडीच ते तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली, तसेच विकसित व सक्षम मतदारसंघ घडवण्यासाठी २० तारखेला महायुतीच्या ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्क्याने पुन्हा एकदा निवडून द्यावे, असे आवाहन या निमित्ताने समाधानदादा यांनी केले.

सदर प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here