पंढरपूर :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे मित्र परिवार यांच्या वतीने माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्याची आतषबाजी करून आमदार अभिजीत पाटील यांना क्रेनच्या साह्याने भला मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की अभिजीत पाटील यांनी केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी त्यांनाआमदार करून दिली आहे.
यावेळी अभिजीत पाटील म्हणाले, की हा सन्मान हा माझ्या घरचा सन्मान स्विकात असल्याचे त्यांनी सांगितले. मी या परिसरात लहानाचा मोठा झालो या परिसरातील नागरिकांनी माझी जडणघडण केली आहे.
ते पुढे म्हणाले, कै.भारतनाना भालके नंतर जनतेने मला स्वीकारले आहे. पुढील पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवून शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आमदार माढ्याचा जरी असलो तरी पंढरपुरातील विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.