ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना अटकपुर्व जामीन मंजुर

पंढरपूर (वार्ताहर):-

अॅड. दत्तात्रय नवनाथ सरडे व अॅड. सारिका माने-गायकवाड यांचा प्रभावी युक्तीवाद

फिर्यादीतील त्रुटी व विसंगती मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर मे न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. पंढरपूर येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील चार आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयााने मंजुर केला आहे. पंढरपूर येथील पंढरपूर शहर पोलीस स्टेशन ठाण्यात अनुसुचित जाती/जमाती आत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1) (r), ३(1) (s), ३(2) (va), प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ चे कलम ११५(२), ३(५), ३३३, ३५२ प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३०/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात स्वाती पवार, युवराज पवार, नितीन पवार, राज पवार यांचे विरूध्द गुन्हा नोदविण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दि. २६/०६/२०२६ रोजी स. ११ वाजाता लहान मुलांचे खेळण्याचे कारणावरून वाद-विवाद झाले होते या घटनेप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आरोपीकडून अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात एन.एस. ४८२ प्रमाणे अर्ज दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी नं. १ ते ४ यांचे वतीने अॅड. दत्तात्रय नवनाथ सरडे व अॅड. सारिका माने-गायकवाड यांनी प्रभावीपणे बाजु मांडुन युक्तीवाद केला. अॅड. प्रकाश महादेव फराटे, अॅड. शंकर देविदास आरकिले व विकास मुळे यांनी कामकाज पाहिले.

फिर्यादीतील विविध त्रुटी व विसंगती पुराव्यानिशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. अॅड. दत्तात्रय नवनाथ सरडे व अॅड. सारिका माने यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादाचा विचार करून मे न्यायालयाने अॅट्रॉसिटी केस प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजुर केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here