राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते भगिरथ भालके यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषदेला निवेदन

पंढरपूर दि.31 ः आज दि.31.05.2021 रोजी पंढरपूर राष्ट्रवादी पक्षाचे नेते श्री भगिरथदादा भालके यांच्या वतीने  पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांना कोरोना या महामारीच्या काळामध्ये पंढरपूर शहरातील नागरिकांच्या मागण्या मान्य करणेसाठी पार्टीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समवेत निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री मानोरकर यांनी रूग्ण-शव वाहिका व शहरातील व्यापार्‍यांच्या गाळ्यांचे भाडे व नागरिकांचा कर माफीचा प्रस्ताव तात्काळ आयुक्ताकडे देण्याचे कबुल करून त्याची प्रत श्री भगिरथ भालके यांना देण्याचे कबुल केले. सोबत निवेदन जोडले आहे. तसेच 65 एकर येथील हॉस्पिटल मध्ये 50 टक्के बेड नगरपालिकेचे कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय शहरातील दारिद्—य रेषेखालील गोर-गरिब नकागरिकांना राखीव ठेवण्याचा ठरावही घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्री भगिरथदादा यांनी मुख्याधिकारी श्री अनिकेत मानोरकर यांना सांगितले की, पंढरपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्याप्रमाणात निधी आणण्याचे आश्वासन देऊन नगरपालिकेची कोण-कोणती कामे प्रलंबित आहेत त्याची प्रत माझ्याकडे द्या कोणतेही राजकारण न आणता मी ती सर्व कामे मुख्यमंत्री मा.ना.श्री उध्दव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री ना.अजितदादा पवार साहेब यांचेकडून मार्गी लावतो असेही दादांनी आश्वासन दिले.
सदर वेळी सर्व नगरसेवक सर्वश्री विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, प्रशांत शिंदे, सुरेश नेहतराव, लखन चौगुले, महादेव धोत्रे व सर्वश्री किरणराज घाडगे, सुधीर धुमाळ, अनिल अभंगराव, महंमद उस्ताद, नागेश गंगेकर, सतीश शिंदे, आप्पा राऊत, संजय बंदपट्टे, स्वागत कदम, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, सतीशबापू घंटे, सुमित शिंदे, शंकर सुरवसे, सागर पडगळ, संतोष बंडगर, स्वप्निल जगताप, तानाजी मोरे, दादा थिटे, सुरज पावले, राजाभाऊ भोसले यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here