अभिजीत पाटील यांचे वाढदिवसानिमित्त श्रीविठ्ठल कारखान्यावर मोफत सर्वरोग निदान शिबीर*

  • वेणुनगर- गुरसाळे (ता. पंढरपूर)-

येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सोमवार दिनांक ३१.०७.२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता चेअरमन मा. श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे ४० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे, डॉ निकम यांचे तुलीप सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, पंढरपुर, विठाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तीन रस्ता, पंढरपूर व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणेत आले होते. सदर शिबीरादरम्यान कर्मचाऱ्यांचे रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, ई.सी.जी. अस्थीरोग व स्त्रीरोग तपासणी अशा विविध तपासणी करुन त्यावरील उपचार मोफत करणेत आले. सदर शिबीराचे उद्घाटन स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी. पी. रोंगेसर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


सदर प्रसंगी स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव श्री बी.पी. शेंगेसर म्हणाले की, कारखान्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानासुध्दा मा. श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे नेतृत्वाखाली गाळप हंगाम २०२२-२३ यशस्वीपणे पार पाडला, ते उत्तम उद्योजक असुन अर्थकारण संभाळत सामाजिक बांधीलकीही ते जपत आहेत. त्यानुसारच आजच्या या मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये पंढरपूरातील नामांकीत डॉक्टर उपस्थित राहिले असून त्याचा सर्वांनी लाभ घेवून तपासणी करुन घ्यावी. त्याचप्रमाणे या शिबीरामध्ये सर्वांनी तपासणी करुन घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले. कारखाना उर्जीत अवस्थेत आणणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

सदर प्रसंगी बोलताना डॉ. प्रशांत निकम म्हणाले की, सर्वरोग निदान शिबीर घेणेचा उद्देशच हा आहे की, वय ४० च्या पुढील नागरिकांना ब्लड प्रेशर, शुगर, सांधेदुखी असे आजार होतात, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे उतरत्या वयामध्ये याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे वेळीच लोकांनी रोगांपासून सावध होऊन तपासणी करुन उपचार करणे गरजेचे आहे.
स्वागत व प्रस्ताविकात बोलताना कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, सर्वरोग निदान व उपचार या शिबीराचे सर्वांनी महत्व पटवून घेवून वेगवेगळ्या आजारावरांचे निदान करून उपचारात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. तरी या सर्वरोग निदान शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा, असेही ते म्हणाले.
हे शिबीर यशस्वी होणेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा शेंडगे, डॉ. प्रशांत निकम, डॉ. विशाल पडे, डॉ. सचिन देवकते, डॉ. सचिन गुटाळ डॉ. सौरुप साळुंखे, डॉ. स्नेहल रोंगे, डॉ. प्रणाली चव्हाण, डॉ. पुजा पवार, डॉ. अनिरुध्द नाईकनवरे व प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे यांचा सर्व स्टाफ व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले. या शिबीराचा ५२८ रुग्णांनी लाभ घेतला.

सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, श्री दिनकर चव्हाण, श्री धनंजय काळे, श्री कालिदास साळुंखे, श्री सचिन वाघाटे, श्री प्रविण कोळेकर, श्री नवनाथ नाईकनवरे, श्री सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती खटके, सौ. सविता रणदिवे, श्री दशरथ जाधव, श्री अशोक तोंडले, श्री धनाजी खरात, श्री सचिन पाटील, श्री उमेश मोरे, अंगद चिखलकर, माजी संचालक श्री दिपक सदाबसे तसेच अभिजीत (आबा) पाटील वाढदिवस समितीचे अध्यक्ष श्री यु. के. तावरे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितीतांचे आभार कारखान्याचे केन मॅनेजर श्री एस.एस. बंडगर यांनी मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here