*माढा मतदारसंघात विकासाचा धुरळा उडवू* – *अभिजीत पाटील*

*(माढा तालुक्यातील बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचा उडाला धुरळा)*

(२ ११,१११ प्रथम बक्षीस बैलगाडा शर्यतीचे ठरले मानकरी नाथसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पै.तेजस भैय्या पाटील)

प्रतिनिधी/-

माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांच्या धडाका लावला आहे. शनिवारी बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाने मोठी धमाल केली. सुमारे दहा हजार बैलगाडा शर्यत शौकिनांनी या कार्यक्रमास
हजेरी लावल्याचे दिसून आले. बैलगाडा शर्यतीतील
बैलांनी अक्षरशः धुरळा उडवून दिला.

यावेळी अभिजीत पाटील यांनी नागरिकांनी पाठीशी उभे राहिल्यास या मतदारसंघात विकास कामांचा धुरळा उडवून देऊ. आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता. आता जशास तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरला आहे अशी बोचक टिका केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघ चर्चेत आला आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी या मतदारसंघात पाय रोवल्याने, कार्यक्रमांचा धडाका उडवून दिल्याने, या मतदार संघातील लढत मोठी चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आ. बबनदादा शिंदे हे महायुतीत असताना, त्यांनी राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांच्याशी संधान बांधणे सुरू केले आहे. एवढ्यावरच न थांबता,
शरद पवार यांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.

विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून, माढा तालुक्यात तळ ठोकला आहे. माढा केसरी कुस्ती स्पर्धा, माढा केसरी बैलगाडा शर्यत, महिलांसाठी खेळ मांडियेला यासारख्या विविध कार्यक्रमांचा धडाका उठवला आहे. शेतकऱ्यांना ऊसचा दर वाढवून देण्यात अभिजीत पाटील यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

माढा केसरी २०२४ बैलगाडा शर्यतीने त्यांनी शेतकरी वर्गाची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. बावी येथे भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या समारोपप्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधित केले. शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन झाल्यावर काय फायदा होतो, हे शेतकऱ्यांना कळले आहे. चेअरमनचा मुलगा चेअरमन झाल्यास कारखान्याची कशी वाट लागते, हेही शेतकऱ्यांनी पहिले आहे. आता शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार करण्याची संधी नागरिकांना आली आहे. नागरिकांनी संधी दिल्यास माढा तालुक्याचा सर्वागिणक विकास करून दाखवणार असल्याचे सांगितले. या तालुक्यात विकासाचा धुराळा उडवून देऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रथम क्रमांक नाथसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पै.तेजस भैय्या पाटील व दुसरा क्रमांक सेवागिरी प्रसन्न सोहम जगदीश बापू शिंदे उरळी तर तिसरा क्रमांक पै.विराज नानासाहेब पिसे पठारवाडी शिरवळ, चौथा क्रमांक बडेबाबा प्रसन्न शिवांश तुषार घोरपडे सरकार पनवेल तसेच पाचवा क्रमांक अतुल नाना सुर्वे मोडनिंब भारत प्रेमी तर सहावा क्रमांक सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी संभाजी गीते पिंपरीकर तर सातवा क्रमांक माॅ तुळजा भवानी प्रसन्न सर्वज्ञा अमोल दादा गायकवाड वडकी यांनी विजय खूचून आणत गुलालाची उधळण करत रोख पारितोषिक मिळवली.

*चौकट :*

माढा तालुक्यातील विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण पुरते ढवळले आहे. विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी या निवडणुकीत रस दाखविल्यामुळे, दोन्ही साखर सम्राट एकमेकांविरोधात उभे राहत असल्यामुळे, या मतदार संघातील लढतीकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here