*भारत नानांचा विचार मी पुढे घेऊन जात आहे -दिलीप धोत्रे*

पंढरपूर :-
कै. भारत भालके,कै.वसंतदादा काळे कै.भिमराव महाडिक यांच्या विचाराने तसेच त्यांचा आदर्श घेऊन कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या नेत्यांचे फोटो लावून आंदोलन, तसेच अन्य सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही.असे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
भगिरथ भालके यांनी आयोजित केलेल्या विठ्ठल परिवाराची कार्यकर्ते च्या जनसंवाद मेळावा मध्ये त्यांनी नामोल्लेख टाळून मनसे पक्षावर टीका केली.या टीकेला प्रतिउत्तर देताना मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी वरील माहिती दिली.

कै. भारत भालके यांच्या 2009 या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये शिवसेनेच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी पासून मी त्यांच्यासोबत कार्य करीत आहे. त्यांच्या विचाराला अनुसरून व त्यांचा आदर्श समोर ठेवून मी माझे कार्य करीत आहे. मला आदरणीय असलेले कै. भारत भालके यांचा फोटो मी आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पुढे मी लावत नसून यापूर्वी देखील मी असंख्य माझे कार्यक्रम हे कै भारत नाना भालके,कै. वसंतदादा काळे व भीमराव महाडिक यांचे फोटो लावून मी माझे कार्य केलेले आहे. आंदोलन केलेले आहे. भारत नाना यांच्या विचाराचा वारसा चालवण्याचा हक्क प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. त्यापैकी मी एक आहे .असे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे आणि आज पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मी माझे मित्र अभिजीत आबा पाटील यांच्या विरोधात मी विठ्ठल परिवाराच्या वतीने भगीरथ भालके यांच्यासोबत काम केले. त्यावेळी मी त्यांना गोड वाटत होतो का? असाही सवाल मनसेनेचे दिलीप भाऊ धोत्रे यांनी केला.

माझ्यावरील गुन्ह्याचा देखील उल्लेख विरोधकांनी केला. परंतु त्यांनी मला अटक कशासाठी झाली? कधी झाली व ती तक्रार कोणी नोंदली? याबाबतीत देखील त्यांनी शहानिशा करावा. असेही मनसेचे नेते दिलीप बापू म्हणाले.

माझ्यावर विरोधक आरोप करीत आहेत की मी पॅकेज घेऊन काम करतोय परंतु मला त्यांना सांगायचा आहे. महायुतीला मी कायमस्वरूपी विरोध दर्शवत आलेलो आहे. महायुतीच्या नेत्यावर व त्यांच्या लोकांवर सातत्याने मी टीका करीत आहे, बोलत आहे .माझ्या भाषणामधून कधीही भालके यांच्या विषयी आरोप केलेले नाही. परंतु त्यांनी माझ्यावर असे का आरोप केले ते मला समजत नाही. मी भारत भालके यांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारायला अनुसरून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझे कार्य करीत आहे. व करीत राहणार आहे. पॅकेज घेणाऱ्यापैकी मी नाही मी एवढा हलक्या दर्जाचा कार्यकर्ता नाही. मी भारत भालके यांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व त्यांचे विचार आणि काम करणारा माणूस आहे. मी कसा आहे हे संपूर्ण समाजाला माहित आहे.

विठ्ठल परिवारातील दोन व्यक्ती आता निवडणूक कसे लढू लागलेली आहे? याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता दिलीप बापू धोत्रे पुढे म्हणाले महाराष्ट्र नव सेनेच्या वतीने मला पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि मी विठ्ठल परिवाराचा सदस्य आहे. कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला सर्व विठ्ठल परिवारांनी पाठिंबा द्यायला हवा. कारण मी विठ्ठल परिवाराच्या सदस्य आहे. उलट त्यांना याबाबत आनंद व्हायला हवा होता. भालके यांना अद्यापही कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळालेली नाही. उलट त्यांनी मला पाठिंबा द्यायला हवा. माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. मी प्रत्येकाच्या संपर्कात आहे. ज्याप्रमाणे कै. भारत भालके काम करायचे त्या पद्धतीने मी काम करीत आहे. प्रत्येकाच्या संपर्कामध्ये मी जात आहे. त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला मी मदत करीत आहे. ही भूमिका भारत भालके यांची घेऊन मी सर्वसामान्य जनतेच्या समोर जात आहे. त्यांच्या संपर्कात जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाचे सडेतोड उत्तर देऊन खंडन केले आहे.

या पत्रकार परिषदेला उपस्थित माजी नगरसेवक महंमद उस्ताद, यासीन शेख वकील, शशीकांत पाटील, संतोष कवडे, समाजसेवक नानासाहेब कदम,बाबा चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here