*10 लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त*
महेश कदम
सोलापूर:-
सोलापूर शहरात पहाटेच्या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 सराईत गुन्हेगारांच्या टोळीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल, 5 जिवंत राऊंड, घातक शस्त्रे, महिंद्रा XUV 500 व दुचाकीसह एकूण 10,29,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांनी मालाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने दि. 20/09/2026 रोजी रात्री सपोनि भरत चंदनशिव व त्यांचे पथक एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गस्त व पेट्रोलिंग करीत असताना पो.शि.-1664 अमोल यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम हे प्लॉट नं. 83, अमर ज्योती नगर, नरसिंग नगरचे शेजारी, मुळेगाव रोड, सोलापूर येथे दरोड्याच्या तयारीत जमले आहेत.
या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. तिथे एक काळ्या रंगाची चारचाकी वाहन (क्र. MH 12 HB 7700) आणि एक मोटारसायकल (क्र. TG 07 AJ 6467) व 7 संशयित इसम आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दरोड्याची तयारी केल्याची कबुली दिली.
मनदीपसिंग दयासिंग संधू वय 43 रा. गुरुद्वारा लंगर साहिब, नांदेड
बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा वय 25 रा. नांदेड,अंकुर रामकुमार प्रताप सिंह वय 28 रा. तारवा, जि. पटना, बिहार,लक्ष्मण नामदेव जगताप वय 35 रा. भागगांव, औरंगाबाद, सुखदेवसिंग बलविंदरसिंग गिल वय 42 रा. पंजाब , दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा वय 34 रा. नांदेड,
राजेश कन्हीराम राठोड वय 44 रा. नरसिंह नगर, मुळेगाव रोड, सोलापूर अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत
01 देशी पिस्टल, 05 जिवंत राऊंड, 02 तलवार, 03 खंजीर, 02 कटावणी, 01 छन्नी, 01 लांब दोरखंड, 03 जोडी हॅन्डग्लोज, 02 नंबर प्लेट, 01 कलर स्प्रे बॉटल, 07 मोबाईल, 01 महिंद्रा XUV 500 व 01 यामाहा मोटरसायकल.
आरोपी राजेश राठोड याने सांगितले की, “आज रात्री ते पहाटे दरम्यान आम्ही सोलापूर शहरामध्ये दरोडा टाकून लूट करणार होतो. त्याकरीता आम्ही दिवसभरात पूर्व तयारी करून हत्यारे व सामान जमा केले आहे.”
या प्रकरणी पो.शि. अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 847/2026 भा.न्या.सं. कलम 310(4) सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37(1)(2), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात या आरोपींवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, हत्यार कायद्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त श्री. दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने, सपोनि भरत चंदनशिव, निलेश सोनवणे, पो.उप-नि. विजय बनसुडे, मनोज मोरे व त्यांचे पथक आणि सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिंद्र राठोड, शाम सुरवसे व चालक यांनी केली आहे



















