देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोन आरोपींना दोन देशी पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह केले जेरबंद

मा. पोलीस निरक्षक, अरुण पवार सो यांच्या आदेशाने दि. 15/01/2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि मगदम व गुन्हे प्रकटीकरण पथक हे गुन्हे प्रतिबंध करणेकामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना शिवाजी चौक येथे आले असताना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अजय बाळकृष्ण खाडे, रा. मंगळवेढा रोड, पंढरपूर हा रिद्धी सिद्धी गणपती मंदिर, गोपाळपूर रोड. पंढरपूर येथे कमरेला हत्यार लावुन थांबला असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांना दिली व तात्काळ माहितीचा खातरजमा करणेकाम नमुद ठिकाणी गेले असता तेथे एक इसम संशयीत रित्या फिरत असलेला दिसला त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आल्याने त्यास पोलीस ठाणेस आणले व पोलीस शिपाई शहाजी मंडले यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 3, 7, 25 भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच दि. 16/01/2022 रोजी मा. पोलीस निरक्षक अरुण पवार सो यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि मगदुम व गुन्हे प्रकटीकरण पथक हे अवैद्य धंधांवर कारवाई करणेकामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे गणेश रमेश शिंदे, रा. संतपेठ, पंढरपूर हा कॉलेज रोडवरील श्रीकृष्ण हॉटेल च्या समोर कमरेला हत्यार लावुन थांबला असलेबाबत माहिती प्राप्त झाली. सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री. अरुण पवार यांना दिली व तात्काळ माहितीचा खातरजमा करणेकामी नमुद ठिकाणी गेले असता तेथे एक इसम संशयीत रित्या फिरत असलेला दिसला त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळुन आल्याने त्यास पोलीस ठाणेस आणले व पोलीस शिपाई शहाजी मंडले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन कलम 3, 7, 25 भाहका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक मा. तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस अधिक्षक श्री. हिंमतराव जाधव सो, मा.श्री. विक्रम कदम सोो., उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर व वरिश्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अरुण पवार यांचे मार्गदर्षनाखाली, गुन्हे प्रकटीकरण षाखेचे सपोनि राजेंद्र मगदुम, सपोफौ राजेश गोसावी, पोहेकॉ/1063 बिपीनचंद्र ढो, पोहेकॉ/181 इरफान मुलाणी, पोहेकॉ/419 शरद कदम, पोहेकॉ/396 सुरज हैबाडे, पोना / 1005 षोएब पठाण, पोना/562 लोहार, पोना/484 सुनिल बनसोडे, पोना/1228 सुजित जाधव, पोकॉ/2190 समाधान माने, पोकॉ/31 कपिल माने, पोकॉ/407 विनोद पाटील, पोकॉ/1216 शहाजी मंडले पोकॉ/1315 अर्जून केवळे यांनी केली असून सदर गुन्हयांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, राजेंद्र मगदुम करीत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here