*मंदिर समितीला आषाढी यात्रेत 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न*

 

*गतवर्षीपेक्षा 2 कोटीने उत्पन्नात वाढ;*

*कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.*

पंढरपूर (ता.26) आषाढी एकादशी दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न झाली. या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दिनांक 6 ते 21 जुलै असा होता. या यात्रेमध्ये मंदिर समितीला 8 कोटी 34 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्रींच्या चरणाजवळ रू.7706694/- (रू.5792383/-), भक्तनिवास रू.5060437/- (रू.4385547/-), देणगी रू.38226828/- (रू.41161512/-), लाडूप्रसाद रू.9853000/- (रू.7480280/-), पूजा रू.399209/- (रू.119614/-) सोने भेट रू.1788373/- (रू.1332475/-), चांदी भेट रू.20365228/- (रू.1733791/-) व इतर रू.364000/- (रू.469030/-) असे एकूण रू.83484174/- (रू.62754227/-) असा उत्पन्नाचा तपशिल आहे. कंसात मागील वर्षाची आकडेवारी आहे. याशिवाय, या कालावधीत श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे पदस्पर्शदर्शन व मुखदर्शन अनुक्रमे सुमारे 483523 व 605004 असे एकूण 1088527 इतक्या भाविकांनी घेतले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here