पंढरपूर (ता.१७) घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
*श्री विठ्ठलास* सोन्याची पगडी, लक्ष्मी हार, हायकोल, तुळशीची माळी एक पदरी, शाळीग्राम हार, शिरपेच लहान, नामनिळाचा, दंडपेट्या जोड, हिऱ्याचे कंगनजोड, कौस्तुभ मणी, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरीम, तोडेजोड, मस्त्य जोड इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.
तसेच **रुक्मिणी मातेस* मोठी नथ, कर्ण फुले, मत्स्य जोड, पैंजणजोड, रुळजोड, पुतळ्यांची माळ, सूर्य, सोन्यामोत्याचे ताणवड, मन्यामोत्याच्या पाटल्या, जडावाचे बाजूबंद जोड, चंद्रहार मोठा, घुंगराचा कंठा, चंद्रहार, अष्टपैलू मण्याची कंठी, ठुशी, कलमाडी बाजूबंद, चिंचपेटी हिरवी, बाजीराव गरसोळी, खड्यांची वेणी, दशावतारी साज इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
*तसेच *राधिका मातेस* नक्षी टोप, जवेची माळ, चिंचपेटी तांबडी, जवमनी पदक, जवेची माळ, मोहरांची माळव **सत्यभामादेवीला* सिद्धेश्वर टोप, पुतळ्यांची माळ, हायकोल, जवेची माळ, लक्ष्मीहार, पुतळ्यांची माळ अलंकार व *श्री. व्यंकटेशास* चांदीची काठी, छत्री इत्यादी अलंकार प्रथा परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.



















